रत्नागिरी : तालुक्यातील वनगुळे-लांजा येथे डेटॉल प्राशन केलेल्या प्रौढाचा उपचारांदरम्यान शनिवार ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.१५ वा. मृत्यू झाला. जयराम गुरव (४५, रा. वनगुळे लांजा, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. बुधवार ६ नोव्हेंबर रोजी जयराम गुरव यांनी राहत्या घरी अज्ञात कारणातून डेटॉल प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, शनिवार ९ नोव्हेंबर रोजी उपचारांदरम्यान जयराम गुरव यांचा मृत्यू झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:53 PM 11/Nov/2024














