संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी चौपदरीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे अरुंद रस्त्यांवरून वाहने चालवावी लागतात. संगमेश्वर येथील सोनवी नाक्यात वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामध्ये अवजड वाहनांचे योग्य नियोजन केले जात नसल्यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडते. त्याचा प्रत्यय आजही वाहनचालकांना आला. दिवाळी सुटीमुळे कोकणात पर्यटनासाठी आलेल्यांना संगमेश्वर येथे बराच काळ अडकून पडावे लागले.
कामे पूर्ण होईपर्यंत येथे वाहतूक पोलिस नियुक्त करणे गरजेचे आहे, असे वाहनचालकांची सूचना आहे.
महामार्गावरील महत्त्वाच्या पुलांमध्ये सोनवी नदीवर पुलाचा समावेश आहे. या पुलाचे काम काही महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले होते. युद्धपातळीवर काम सुरू असले तरीही या मागौला पर्यायी रस्ता नसल्यामुळे वाहनांची मोठ्याप्रमाणात येथे गर्दी असते. काम सुरू ठेवतानाच महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सोनवी नाक्यामध्ये व्यवस्था करणे आवश्यक होते. मात्र कोणत्याही प्रकारची उपाययोजना न करता वाहतूक सुरू असल्यामुळे सोनवी नाक्यात अनेकवेळा वाहने अडकून पडत आहेत. कोल्हापूरकडे जाणारी वाहनांनाही या कोंडीचा फटका बसतो. गेले अनेक दिवस वाहतूक कोंडीमुळे प्रवासी वर्ग मेटाकुटीला आला असून, यावर उपाययोजना करण्यात प्रशासन अयशस्वी ठरत आहे. अवजड वाहने आल्यानंतर तासतासभर वाहने एकाच जागी उभी ठेवून राहावे लागते. जोपर्यंत मोठी वाहने जात नाहीत, तोपर्यंत कोंडी फुटत नाही. वाहतूक पोलिस असले की तातडीने त्यावर उपाययोजना होते, परंतु पोलिस नसले की मोठी गैरसोय होते. सध्या दिवाळीच्या सुट्या सुरू असल्यामुळे मोठ्याप्रमाणात वाहनांची ये-जा सुरू आहे. त्याचा फटका अनेक चालकांना बसतो. या मार्गावरून रुग्णवाहिका आली की मोठीच गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
संगमेश्वर येथील या सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाकडून गांभीयनि पाहिले पाहिजे. वाहनचालकांची गैरसोय होणार नाही, काळजी घेतली पाहिजे. – संतोष येराडे, संगमेश्वर
खड्डे आणि धुळीचा प्रश्न कायम
सोनवी पुलावर खड्डू पडलेले असतानाही ते बुजवले जात नाहीत. त्याचा फटका दुचाकीस्वारांना बसत आहे. खड्डे वाचवण्याच्या नादात समोरुन येणाच्या मोठ्या वाहनाची धडक बसून अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच बरोबर अवजड वाहनांमुळे या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून वाहन चालकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:29 PM 11/Nov/2024














