रत्नागिरी : प्रभाग २ मध्ये उदय सामंतांच्या प्रचाराचा धडाका

रत्नागिरी : जुना माळ नाका, सन्मित्र नगर, ओसवाल नगर, मारुती मंदिर या प्रभाग दोन मध्ये उदय सामंतांच्या प्रचाराचा जोरदार धडाका कार्यकर्त्यांनी लावलेला दिसत आहे. उदय सामंत यांच्या प्रचारासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी चे कार्यकर्ते मोठ्या संखेने प्रचारात सहभागी झाल्याचे दिसत आहे.

या प्रभागाच्या नगरसेविका स्मितल पावसकर आणि नगरसेवक निमेश नायर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन प्रचार करण्यात येतोय. नागरिकांकडून देखील या प्रचाराला प्रतिसाद मिळताना दिसतोय. आम्हाला विकासकामे करणारा उदय सामंतांसारखाच लोकप्रतिनिधी हवा, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया नागरिक देताना दिसत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 12-11-2024