आम्हाला विकास करणारा उदय सामंतांसारखाच लोकप्रतिनिधी हवा; नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया

रत्नागिरी : रत्नागिरीत ना. सामंतांच्या माध्यमातून करण्यात आलेली विकासकामे आता बोलू लागली आहेत. मतदार संघातील सर्वच भागात शिवसेना, बीजेपी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराची राळ उठवून दिली आहे. शिवसेनेसोबत बीजेपीचे कार्यकर्ते देखील एकदिलाने प्रचारात सामील झाल्याचे चित्र आहे.

मतदारसंघाच्या प्रत्येक भागात शिवसेनेच्या या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. आम्हाला विकास करणारा उदय सामंतांसारखाच लोकप्रतिनिधी हवा अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया नागरिकांमधून येताना दिसत आहेत.

उदय सामंत यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा झालेला सर्वांगीण विकास नागरिकांनी पाहिलाय. याच विकासकामांच्या जोरावर उदय सामंत या निवडणुकीला सामोरे गेले आहेत. रत्नागिरीतील मतदार सुज्ञ आहे. आपल्या सातत्याने संपर्कात असणाऱ्या, नेहमी आपल्या अडीअडचणीला धाऊन येणाऱ्या, सुसंस्कृत, सुशिक्षित उमेदवारालाच आपण निवडून दिले पाहिजे हे येथील जनतेला माहित आहे, असे मत मतदारसंघातील जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केलंय.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 12-11-2024