रत्नागिरी : कार्तिकी एकादशीनिमित्त मंगळवारी (ता. १२) येथील श्री विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. प्रतिपंढरपूर म्हणून गणल्या गेलेल्या या मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभला असून, कार्तिकी उत्सवाला तयारी पूर्ण झाली आहे. मंदिर परिसरात छोट्या व्यवसायासाठी जागा निश्चित केल्या असून, उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच शहरात भाविकांची गर्दी वाढती आहे.
रत्नागिरीत विठ्ठल मंदिराचा कार्तिकी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो कार्तिकी एकादशीला पहिली पूजा झाल्यानंतर पहाटे काकड आरती होईल त्यानंतर विद्युत रखुमाई मित्रमंडळातर्फे सकाळी ८ वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंत व तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत बारा पारंपरिक भजनी मंडळांच्या भजनांचे आयोजन केले आहे. रात्री ११ च्या दाम्यान भजने झात्यानंतर रात्री १२ वा रथोत्सव सुरू होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. विठोबाचा रथ सजवण्यात आता आहे. हा रथ गोखलेनाका, धनजीनाका, श्रीराम माळी, तेलीआळी चव्हाटा, मारुती आळी, गोखलेनाका मार्गे फिरून पुन्हा मंदिरात येणार आहे. त्यानंतर विठ्ठलाची पालखी हरिहरेश्वर भेटीसाठी तृणबिंदुकेबवर मंदिरात नेण्यात येते व पहाटे साडेपाच वाजता मंदिरात परत येते. या उत्सवात परटवणे येथून भार्गवराम मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत पायी दिंडी येते. उत्साहात साजऱ्या होणाऱ्या कार्तिकी उत्सवात व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेला गर्दी केली आहे. रामआळी ते अगदी विठ्ठल मंदिरपर्यंत कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला व्यावसायिकांची गर्दी पाहायला मिळाली.
विविध धार्मिक उपक्रम
श्री विठ्ठल मंदिर संस्थेतर्फे गुरुवारी (ता. १४) श्रीची नगर प्रदक्षिणा मिरवणूक दुपारी १ वा. मंदिरातून निघणार आहे. शुक्रवारी (ता. १५) त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव सायंकाळी साडेसात वाजता तुलसी विवाह, तसेच श्री स्वामी समर्थ पौर्णिमा उत्सव दुपारी १२ वा. आरती व महाप्रसाद व शनिवारी (ता. १६) काकड़ा आरती समाप्ती व दुपारी १ वा. महाप्रसाद होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 12/Nov/2024














