राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत डेरवणच्या तन्मयी जाधवला रजत पदक

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट इंग्लिश मिडियम स्कूलची तन्मई जाधव हिने २०० मीटर वैयक्तिक मिडले क्रीडा प्रकारात रजत पदक पटकावले व तिची शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ही स्पर्धा पुणे बालेवाडी येथे संपन्न झाली. तन्मई जाधव एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात पाच वर्ष नियमित सराव करत आहे.तन्मई इयत्ता दहावी च्या वर्गात शिकत आहे. तिला मिळालेल्या यशाच्या मागे त्यांचे प्रशिक्षक विनायक पवार यांचा खूप मोलाचा वाटा आहे. कोकणामध्ये जलतरणासाठी खेळाडू तयार करणे तसे अवघड आहे. पण हार न मानता सतत चिकाटीने प्रयत्न केल्यास नक्की यश मिळते अशी प्रतिक्रिया प्रशिक्षक पवार यांनी दिली. जिल्ह्यात प्रथमच सलग २ वेळा जलतरणामध्ये राज्यस्तरावर यश मिळवले आहे.

मुंबई येथील फॉरेस्ट क्लब चे प्रमुख प्रशिक्षक संदीप पाटील यांचेही मार्गदर्शन खेळाडूंना लाभते. एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलाचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर व शाळेच्या संचालिका शरयू यशवंतरावयांनी विजेती खेळाडू तन्मई जाधव तसेच प्रशिक्षक विनायक पवार यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तन्मई जाधव ह्या खेळाडूची राजकोट येथे दि.२४ ते २८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 12-11-2024