लांजा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी लांजा बाजारपेठेतून मतदान जनजागृतीसाठी दुचाकी फेरी काढण्यात आली.
तहसीलदार कार्यालयापासून फेरीला सुरुवात झाली. मुख्य बाजारपेठेतून ही फेरी कोर्ले फाटा येथील श्री बसवेश्वर चौक व पुन्हा मुख्य बाजारपेठेतून तहसीलदार कार्यालय येथे आणण्यात आली. फेरीतून मतदान जागृती करण्यासाठी घोषवाक्य, विविध गाणी, बॅनर दाखवून मतदान जागृती करण्यात आली. फेरीत महसूल, सामान्य प्रशासन, शिक्षण, पोलीस, आरोग्य आणि अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 12-11-2024














