रत्नागिरी : झरेवाडी येथे वृद्धाने केले विष प्राशन

रत्नागिरी : तालुक्यातील झरेवाडी येथील वृद्धाने अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यशवंत लक्ष्मण गोताड (वय ७०, रा. झरेवाडी, रत्नागिरी) असे विष प्राशन केलेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवार, १० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वा. सुमारास झरेवाडी येथे घडली. यशवंत गोताड यांनी शेतात असताना कोणत्यातरी अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केले. काही वेळानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यनंतर त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 12/Nov/2024