रत्नागिरी : नाखरे रस्त्यावरील दुचाकी अपघातात महिला जखमी

रत्नागिरी : तालुक्यातील पावस खांबड मार्गे नाखरे रस्त्यावर लांजेकर स्टॉप येथील रस्त्यावर दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात महिला जखमी झाली आहे. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उचार सुरू आहेत. अश्विनी अशोक मांडवकर (वय ४०, रा. कालकरकोंड, नाखरे, रत्नागिरी) असे दुखापत झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वा. सुमारास लांजेकर स्टॉप येथे घडली. सोमवारी सकाळी अश्विनी मांडवकर त्यांचा मुलगा आर्केश मांडवकर सोबत त्याच्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८-एएल-३३५२) वरुन कालकरकोंड ते खांबडमार्गे नाखरे रस्त्यावरुन जात होत्या. त्यांची दुचाकी लांजेकर स्टॉप येथे गतिरोधकावरून जात असताना मागे बसलेल्या अश्विनी या खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 12/Nov/2024