रत्नागिरी : तालुक्यातील गोळप येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची ९ लिटर दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र हरी शेडगे (वय ४९, रा. पावस नालेवठार, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हवालदार ललित देवूसकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित हा बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात ९५० रुपयांची ९ लिटर दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 12/Nov/2024














