गुहागर : आवडे येथे बेकायदा हातभट्टीची दारू बाळगणाऱ्या विरोधात गुन्हा

रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील आवडे झगडेवाडी येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची २५ लिटर दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार, १० नोव्हेंबर रोजी दुपारी १.१५ वा. करण्यात आली. विजय पांडुरंग जाधव (४९, रा. कुडली, गुहागर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात कॉन्स्टेबल सूरज कडू यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार रविवारी दुपारी संशयित हा आपल्या ताब्यात गावठी हातभट्टीची ६ हजार ६५० रुपयांची २५ लिटर दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 12/Nov/2024