रत्नागिरी : मतदानाला अवघे काही दिवस उरलेले असताना देखील मशाल कुठे आहे असा प्रश्न मतदारातून विचारला जातोय. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात धनुष्य बाण आणि मशाल यामध्येच खरी लढत होणार आहे. मात्र प्रचाराच्या सर्वच माध्यमांवर मशाल प्रचंड मागे पडल्याचे चित्र आहे. ज्या संखेने शिवसेनेचे कार्यकर्ते घराघरात जाऊन प्रचार करीत आहेत, त्या तुलनेत ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते दिसत नसल्याचे जाणवत आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे भाकित देखील काही राजकीय जाणकार करीत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे. प्रत्येक गावात, प्रभागात बैठका घेतल्या जात आहेत.
याचदरम्यान अनेक पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. या बाबतची प्रत्येक अपडेट देण्यासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी शिवसेना उमेदवार उदय सामंत स्वतः माध्यमांसमोर येत आहेत. मात्र दुसरीकडे बीजेपी मधून ठाकरे गटात गेल्यावर बाळ माने हे एकदाही प्रसार माध्यमांसमोर आलेले नाहीत. एकंदर संपूर्ण मतदार संघात धनुष्य बाणाने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 12-11-2024











