रत्नागिरी : इन्फिगो आयकेअरतर्फे एसटी चालक – वाहक, अधिकाऱ्यांची नेत्र तपासणी

रत्नागिरी : जागतिक वाहतूक सार्वजनिक दिनानिमित्त इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल रत्नागिरी येथे राज्य परिवहन महामंडळातील चालक-वाहक तसेच कर्मचारी व अधिकारी यांच्याकरिता मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.

जागतिक वाहतूक दिनाचे औचित्य साधून इन्फिगो हॉस्पिटल येथे झालेल्या शिबिराला कामगार अधिकारी शंकर यादव, विलास चौघुले, मृदुला जाधव, बाळाजी कांबळे, राजेश्वर जाधव, राजेश पाथरे व इन्फिगो हॉस्पिटलमधील डॉ. प्रतिभा चाचडी, मंगेश पावसकर हे उपस्थित होते. या वेळी इन्फिगोतफे रत्नागिरी आगारातील २५ वर्षे उत्कृष्ट काम, सेवा करणाऱ्या दोन चालकांचा सत्कार करण्यात आला.

सावर्जनिक वाहतूक हो एक महत्त्वाची सेवा आहे. शहरातील लोकसंख्या वाढत असून वाहतुकीचा ताणही वाढतोय, सर्वाधिक लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी सर्व टीम जबाबदारीने आपले काम पार पाडतात. या माध्यमातून सामाजिक जबाबदारी म्हणून चालक यशवंत मयेकर, वाहक सुधाकर शिर्के यांचा सत्कार करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 12/Nov/2024