रत्नागिरीत झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पद्धतीत प्रथमच एआय तंत्रज्ञानाचा वापर

रत्नागिरी : रत्नागिरीत झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) प्रथमच वापरलेल्या एआय तंत्रज्ञानामुळे परीक्षा पद्धतील पारदर्शकता राखणे शक्य झाले. परीक्षेला बसलेले २५०० उमेदवार सीसीटीव्हीच्या निगराणीखाली हाते. या कालावधीत परीक्षा केंद्रावर घडलेल्या दोन घटनांची उलट तपासणी थेट पुण्यातील मुख्य केंद्रातून करण्यात आली. पहिली ते आठवीपर्यंत शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली टीईटी परीक्षा रत्नागिरीत रविवारी (ता. १०) पाच केंद्रावर शांततेत पार पडली. या परीक्षेसाठी २ हजार ७२६ इतके उमेदवारांनी नोंदणी केलेली होती. त्यामध्ये प्रत्यक्षात २५०० उमेदवार हजर होते. तर २२६ उमेदवार गैरहजर होते. परीक्षेत पारदर्शकता राहावी, यासाठी एआय तंत्राचा उपयोग करण्यात आला होता. प्रत्येक वर्गामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेले होते. ते सर्व पुण्यातील मुख्य केंद्रांशी जोडलेले होते.

त्यामुळे केंद्रावर कोणतीही संशयास्पद घटना घडली, तर त्याची माहिती तत्काळ पुण्यातील मुख्य केंद्राला समजणार होती. एका केंद्रावर परीक्षा सुरु असलेल्या वर्गाच्या दरवाज्या जवळील बेंचवर बसलेले उमेदवार सीसीटीव्हीच्या कक्षेत दिसत नव्हते. याबाबत पुण्यातून थेट केंद्र प्रमुखांशी संपर्क साधून विचारणा करण्यात आली. तर एक उमेदवार केंद्रावर जात असताना तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत होती.

याची दखल घेत तातडीने संबंधितांशी संवाद साधून विचारणा झाली होती. ही प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, परीक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांचे स्कॅनिंग करून बोटोंचे ठसे घेतले होते. पेपर एक व दोनसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था होती. तसेच प्रवेशपत्रासोबत आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा मतदान कार्डचीही तपासणी केली गेली.

शिक्षक पात्रता परीक्षा शांततमध्ये पार पडली. सीसीटीव्ही यंत्रणा असल्यामुळे पारदर्शकता होती. उमेद्वारांची उपस्थितीही चांगली होती. – जयदेव कासार, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 12/Nov/2024