रत्नागिरी : सेंद्रिय शेतीच्या प्रोत्साहनासाठी कृषी विभागातर्फे प्रबोधन अभियान

रत्नागिरी : जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागातर्फे सेंद्रिय शेती प्रबोधन अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादनात वाढ होत असली तरी जमिनीचा पोत सुधारून तिची उत्पादन क्षमता टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर महत्त्वपूर्ण आहे. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे पिकांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या सोळाही अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो.

सेंद्रिय खतांमुळे अन्नद्रव्यांच्या पुरवठ्याबरोबर मातीच्या कणांची बदलून जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीमध्ये हवा खेळती राहते व जमिनीचे तापमान कमी राहते. जमिनीतील उपयुक्त जीवाणूंच्या संख्येत व कार्यक्षमतेत वाढ झाल्याने अन्नद्रव्याच्या उपलब्धतेत वाढ होते. हिरवळीच्या खतांमुळे सेंद्रिय खतांचा पुरवठा होतो. जमिनीच्या भौतिक, रासायनिक गणांमध्ये सुधारणा होते. यासाठी सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांना प्रबोधित करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 12/Nov/2024