गुहागर : राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी हरिश्चंद्र बाचीम यांची बिनविरोध निवड झाली. ही निवड शृंगारतळी येथे झालेल्या संघटनेच्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मेळाव्यात करण्यात आली. या वेळी नवीन जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.
शृंगारतळी येथे झालेल्या मेळाव्याला महासंघाचे राज्य संगठन सचिव मंगेश म्हात्रे, राज्य सहसचिव अॅड. राहुल जाधव, सदस्य गोविंद म्हात्रे, राज्य कार्यकारिणी सदस्य यलाप्पा कोळी, सांगली जिल्ह्यातील महंतेश महपती आणि श्रीकांत गुरव, नरेश काळेकर व विजय सत्वे हे विशेष उपस्थित होते. मेळाव्याला जिल्ह्यातील सुमारे ३५०हून अधिक ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. राज्य पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यकारिणीची फेरनिवड प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. नवीन जिल्हा कार्यकारिणीची निवड करताना खेड तालुक्याचे हरिश्चंद्र बाचीम यांची जिल्हाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
सचिवपदी चिपळूण तालुक्याचे संजय खताते, सहसचिवपदी गुहागर तालुक्याचे सुदेश हडकर यांची निवड झाली. संघटनेच्या उपाध्यक्षपदी दापोली तालुक्याचे अनंत पद्याल, गुहागरचे राजेश घाणेकर आणि राजापूरचे संदीप हरयाण यांची नेमणूक करण्यात आली तसेच संघटनेच्या खजिनदारपदी रत्नागिरी तालुक्याचे वैभव सुपल यांची नेमणूक करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 25/Sep/2024