रत्नागिरी : महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे विकसित राज्य बनवण्याचा भारतीय जनता पक्षाचा संकल्प आहे. त्या अनुषंगाने जाहीर केलेल्या संकल्पपत्रामध्ये ठळक २५ मुद्यांमध्ये कोकणाशी निगडित महत्वाच्या मुद्यांचा समावेश आहे.
मिशन मत्स्य, कोळंबी उत्पादन वाढवणे, मत्स्य विद्यापीठ उभारणे, पर्यटनवाढीसाठी कम टू कोकण, नमनसारख्या पारंपरिक कला जोपासणे, नदीपात्रांची धूप रोखण्यासाठी पृष्ठातिबंध उपाययोजना करणे आदी संकल्प महायुतीची सत्ता आल्यास पूर्णत्वाकडे नेले जातील, असे आश्वासन भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली. भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी बाबासाहेब परुळेकर, अशोकराव मयेकर, सतेज नलावडे, विवेक सुर्वे, दादा दळवी, ऐश्वर्या जठार, उमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
सावंत म्हणाले, पक्षाने दिलेली अनेक आश्वासने पूर्ण केली असल्याने देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा सतेचा कौल दिला आहे. गरीब, महिला, युवक, शेतकरी, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जातीजमाती आणि राज्यातील सर्व समाजघटकांसाठी लाभाच्या योजना, पायाभूत सुविधांचा वेगवान विकास, औद्योगिक विकासासाठी विशेष सवलती, विज्ञान-तंत्रज्ञान व माहिती दळण क्षेत्रातील अत्याधुनिक साधनांच्या वापर विकासास प्रोत्साहन, आरोग्य व शिक्षणक्षेत्रासाठी विशेष योजना, धार्मिक आस्थांच्या जपणुकीची हमी आणि सामाजिक जीवनमान उंचावणाऱ्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेला संकल्प अशा सर्वसमावेशक हमीचे विकल्प म्हणजे महाराष्ट्राच्या गतिमान विकासाचा रोडमॅप ठरेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 12/Nov/2024














