देवरुख : नव्याने नियुक्त झालेल्या संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रशिक्षण देवरूख हायस्कूल येथे नुकतेच झाले. या प्रशिक्षणाची सांगता बासरी वादनाने करण्यात आली. या ७ दिवसांच्या प्रशिक्षणाचा समारोप करताना प्रशिक्षणार्थी शिक्षक राहुल इंगळे यांनी सुरेल व बहारदार बासरी वादन केले. प्रशिक्षण वर्गात घेतलेल्या कृती, उपक्रम तसेच विविध गोष्टींचा अनुभव घेतल्यानंतर त्याची झलक म्हणून मतदार जागृती संदेश, रांगोळी रेखाटन, काव्य वाचन, बासरी वादन या कलांना शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रशिक्षणात मिळालेली विविध प्रकारची माहिती व ज्ञान याचा उपयोग आपापल्या शाळेत नक्कीच करू अशीही ग्वाही प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी दिली. समारोपप्रसंगी मार्गदर्शक समीर काबदुले, भिंगार्डे, श्रीकृष्ण खातू, संतोष चव्हाण, विनय होडे, सतीश वाकसे, सचिन सकपाळ, अजिंक्य नाफडे, केंद्रप्रमुख यादव, जाधव, माने, करंबेळे, अभिमन्यू शिंदे, होतेकर, देसाई, कांबळे, माईन आदी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 12/Nov/2024














