रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा वाढला वापर

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून प्रचाराचा जोर वाढला आहे. अनेक उमेदवारांचे कार्यकर्ते आपआपल्या परीने जसा होईल तसा आपआपला प्रचार करत आहे. यामध्ये सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर केला जात आहे. या माध्यमातून एका पक्षाकडून काही पोस्ट व्हायरल केल्यावर अन्य पक्षाकडून लगेच त्या पोस्टला उत्तर देण्यासाठी दुसरी पोस्ट केली जात आहे. तसेच यामध्ये मिम्सचा धुमाकूळ वाढला आहे. शहरासह ग्रामीण भागातही प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. प्रचारासाठी थोडेच दिवस शिल्लक राहिल्याने प्रमुख पक्षांसह काही अपक्षांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी सोशल मीडियाची स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. काही उमेदवारांनी वॉररुम तयार केली आहे. या रुममधून विधानसभा मतदार संघात गावनिहाय व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले आहे. तसेच पूर्वीच्या ग्रुपमध्येही समाविष्ठ होत आपआपल्या उमेदवारांबद्दल विविध पोस्ट अपलोड करण्यात येत आहेत व आपल्या उमेदवाराबाबत पोस्ट शेअर करण्याचे आवाहन पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 12/Nov/2024