रत्नागिरी : रोजगार हवा असेल, तर नुसत्या पदव्यांवर समाधान मानून चालणार नाही. पुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) हाच पर्याय असेल. विज्ञान इतके पुढे जात आहे की, त्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवता येणार नाही. क्रांती तुम्ही रोखू शकत नाही. स्वतःचे छोटे छोटे उद्योग सुरू करायला लागतील, कारण, एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या मिळणार नाही, हे एक नवीन आव्हान आहे आणि ते स्वीकारले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले. अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
नाट्य, अभिनय क्षेत्रात आज नवनिर्माण शिक्षण संस्था रौप्य महोत्सवी असणाऱ्या प्रचंड संधी कोकणातील उपजत कलाकार असणाऱ्या मुलांना मिळण्यासाठी नवनिर्माणने सेंट झेविअर्ससारखे मनोरंजन क्षेत्रातील कोर्सेस सुरू करावेत, त्यासाठी सर्व ते सहकार्य आपण करू, असे राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य यांनी यावेळी सांगितले.
राज्यस्तरीय नवनिर्माण गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात नवनिर्माण संस्थेच्या वतीने विज्ञान, शिक्षण, सामाजिक, साहित्य या चार क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यातील सामाजिक साहित्य या चार क्षेत्रात उपेक्षित घटकासाठी काम करणाऱ्या ‘मानवलोक’ संस्थेचे अनिकेत लोहिया (आंबेजोगाई, जि. बीड) आणि विज्ञान क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विज्ञान प्रसारक शिवाजी माने (जढाळा, लातूर) यांना नवनिर्माण गौरव पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला. २५००० रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी डॉ. मुणगेकर म्हणाले, माझ्या कुलगुरू पदाच्या काळात मी जी काही चांगले कामे केली आहेत त्यातले एक म्हणजे ‘नवनिर्माण ‘ला परवानगी देणे, बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी नवनिर्माणने ज्ञानाची कवाडे खुली केली. यावेळी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, संस्था उपाध्यक्ष डॉ. अलीमिया परकार आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 12/Nov/2024














