मतदानपूर्व, मतदानादिवशीच्या जाहिरातींना एमसीएमसीचे प्रमाणीकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी : निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल अशा जाहिराती प्रकाशित होऊ नयेत, याबाबतच्या निवडणूक आयोगाच्या या निर्देशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या २० नोव्हेंबर २०२४ मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच १९ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रिंट माध्यमांमध्ये कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य/जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व-प्रमाणित केली जात नाही, तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करू नये.

निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसापूर्वी प्रिंट माध्यमांमधून भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये. ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल अशा जाहिराती प्रकाशित होऊ नयेत, याबाबत दक्षता घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 12/Nov/2024