देवरूखची पायल घोसाळकरने बिहारमधील ‘जीविका प्रकल्पा’द्वारे ३० हजार शेतकरी कुटुंबांना दिला योजनांचा लाभ

देवरूख : शहरातील पायल घोसाळकर ही आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर बिहार राज्यातील लाखो कुटुंबांचे जीवन उंचावण्यासाठीच्या ‘जीविका प्रकल्पा’ द्वारे मोलाचे कार्य करत असून, तेथील २ लाख कुटुंबांना सक्षम बनवण्याचे तिचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पावर अधिकारीपदी असलेल्या पायलच्या कार्याचे कौतुक बिहारसह महाराष्ट्रातही होत आहे.

बिहारमध्ये सीतामातेच्या असलेल्या जिल्ह्यात माहेर मधुबनी पायलने आपल्या कार्याची सुरुवात केली. बिहारची प्रतिमा अनेकदा विपरीत दिसत असली, तरी गरिबी, बेरोजगारी व जातीयवादाच्या समस्यांवर तिने प्रभावीपणे उपाय योजले. पहिल्याच वर्षी तिने सुमारे ३० हजार शेतकरी कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कार्य केले, हा आकडा दरवर्षी वाढत आहे. आज ती बिहारच्या पाटणातील मंत्रालयातून काम करत असून, २ लाख कुटुंबांना सक्षम बनवण्याचे तिचे उद्दिष्ट आहे.

पायलच्या ‘जीविका बेस्ड ऑन माय विहार डायरीज’ या लेखात आपल्या जीवनप्रवासाचे थोडक्यात वर्णन केले आहे, ज्यात तिच्या कार्याची प्रेरणादायी कहाणी समाविष्ट केली आहे. त्याचप्रमाणे बिहारमध्ये देवरुखच्या पायलने आपले कार्यक्षेत्र विस्तारून, बिहारमधील लाखो लोकांचे जीवनमान उंचावत, कोकणासह महाराष्ट्रातील तरुणींसाठी आदर्श निर्माण केला आहे.

पायल घोसाळकर ही सुप्रसिद्ध भजनसम्राट राजू घोसाळकर यांची कन्या असून, तिने लहानपणापासूनच भजनाच्या माध्यमातून समाजात विशेष स्थान निर्माण केले आहे. जाखडी, नमन, ऑर्केस्ट्रा, बेंजो, जलसा, कव्वाली या विविध संगीत प्रकारांवर राजू घोसाळकर यांचे प्रभुत्व आहे. पायलनेही त्यांच्या पावला वर पाऊल टाकत या सर्वात प्रभुत्व गाजवले आणि ‘युवा भजनसम्राट’ म्हणून कोकणात नावलौकिक मिळवला. कोकणातील जमिनींचे संवर्धन यांसारख्या ज्वलंत मुद्यांवर तिने समाजप्रबोधन केले आहे. याचबरोबर पुढे अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या प्रकल्पाद्वारे ईशान्य भारतात शेतकरी महिलांसाठी कार्य करत असताना तिच्या कामाचे कौतुक झाले. याच माध्यमातून बिहार सरकारने तिला त्यांच्या जीविका प्रकल्पासाठी नियुक्त केले. या दरम्यान विविध देशांतील पाहुण्यांना बिहारची परिस्थिती समजावून देण्याचे काम तिच्याकडे आले. त्यात महाराष्ट्र राज्य सरकारच्या पथकाला तिच्या कार्याचे विशेष कौतुक वाटले. त्यांनी तिला महाराष्ट्रात आणण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, महाराष्ट्रात जीविका प्रकल्प नसल्याने ती बिहार सोडू शकली नाही.

छ. शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन, देवरुखसारख्या छोट्या गावातून निघालेली पायल बिहारसारख्या प्रदेशात आत्मविश्वासाने कार्यरत आहे. तिचे हे ध्येय आणि कर्तृत्व कोकणातील अनेक कन्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.

बिहार सरकारकडून जीविका प्रकल्पासाठी नियुक्ती
पायलच्या सामाजिक कार्याची सुरुवात कोसुंब हायस्कूलमध्ये शिक्षण घेताना झाली. फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे अर्थशास्त्र विषयात पदवी आणि अझीम प्रेमजी विद्यापीठ, बंगलोरमध्ये पुढील शिक्षण घेतल्यानंतर सामाजिक जाणिवेचे बाळकडू तिच्या विकसित झाले. अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या प्रकल्पाद्वारे ईशान्य भारतात शेतकरी महिलांसाठी कार्य करत असताना तिच्या कामाचे कौतुक झाले. याच माध्यमातून बिहार सरकारने तिला त्यांच्या जीविका प्रकल्पासाठी नियुक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 12/Nov/2024