रत्नागिरी : नाखरे येथे चिरेखाणीवर अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या 13 बांग्लादेशी घुसघोरांना अटक

रत्नागिरी : तालुक्यातील नाखरे-कालरकोंड वाडी येथील चिरेखाणीवर अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या 13 बांग्लादेशी घुसघोरांना दहशतवाद विरोधी पथकाने मंगळवार 12 नोव्हेंबर रोजी पहाटे 3.40 वा. अटक केली.

वहिद रियाज सरदार (35), रिजाउल हुसेन करीकर (50), शरिफूल हौजीआर सरदार (28), फारुख महंमद जहीरअली मुल्ला (50), हमिद मुस्तफा मुल्ला (45), राजु अहमद हजरतली शेख (31), बाकिबिल्लाह अमीर हुसेन सरदार (39), सैदूर रेहमान मोबारक अली (34) आलमगिर हूसेन हिरा सन ऑफ अब्दुल कादर दलाल (34), मोहम्मद शाहेन सरदार सन ऑफ समद सरदार (32), मोहम्मद नुरुझमान मोरोल सन ऑफ बलायत अली (38), मोहम्मद नुरहसन सरदार सन ऑफ मोहम्मद जहर सरदार (45) आणि मोहम्मद लालूट मोंडल सन ऑफ किताब अली (37 सर्व रा. ढाका, बांग्लादेश) अशी अटक करण्यात आलेल्या तेरा जणांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात दहशतवाद विरोधी शाखेचे पोलिस नाईक रत्नकांत शिंदे यांनी तक्रार दिली आहे.

त्यानुसार, संशयित 13 बांग्लादेशी घुसखोर जून 2024 पासून अद्यापपर्यंत वैध कागदपत्रांशिवाय तसेच भारत-बांग्लादेश सिमेवरील मुलखी अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय भारतात अवैधरित्या प्रवेश करुन आसिफ सावकार (रा. पावस बाजारपेठ, रत्नागिरी) याच्या नाखरे ग्रामपंचायती हद्दीतील कालरकोंड वाडी येथील चिरेखाणीवर वास्तव्य करताना मिळून आले. त्यांच्या विरोधात पारपत्र भारतात प्रवेश नियम 1950 चा नियमासह 6, परकिय नागरिक आदेश 1948 परि.3 (1) (अ), परकिय नागरिक कायदा 1946 चे कलम 14 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पूर्णगड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदिप साळोखे करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 12/Nov/2024