चिपळूण महाविकास आघाडी १९ सप्टेंबरला महावितरणवर धडक देणार

चिपळूण : शहरातील मार्कंडी, कावीळतळी भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन जनतेला त्रास होत असून गेले वर्षभर हा त्रास वाढला आहे. याबाबत महाविकास आघाडीतर्फे १९ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता येथील महावितरण कार्यालयावर धडक देण्यात येणार आहे, असा इशारा चिपळूण शहराध्यक्ष रतन पवार, शशिकांत मोदी व लियाकत शहा यांनी दिला आहे.

शहरातील मार्केडी, कावीळतळी भागात वीजपुरवठा खंडित होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेऊन या भागातील जनतेला त्रास होणार नाही या पद्धतीने वीजखांबावरील दुरुस्तीचे काम करावे तसेच या भागातील बीजपुरवठा खंडित झाल्यास खेर्डी, पेढांबे, वालोपे व चिपळूण येथून त्यांना जॉइंट कनेक्शन देता येते का तेही पाहावे. सणावाराला वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. या निवेदनाची गांभीयनि दखल घेऊन योग्य उपाययोजना करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा चिपळूण शहर महाविकास आघाडीच्यावतीने देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 17-09-2024