नवी दिल्ली : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी आज बुधवारी (दि.१३) निवडणुका होणार आहेत तसेच १० राज्यांत ३१ विधानसभा जागांसह केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात बुधवारी पोटनिवडणुका होतील.
वायनाडमध्ये काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी निवडणूक रिंगणात आहेत.
सिक्कीममधील विधानसभेच्या २ जागांवर ३० ऑक्टोबरला सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाच्या (एसकेएम) दोन उमेदवारांची बिनविरोध झाली आहे. यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकांत केरळमधील वायनाड व उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन्ही मतदारसंघांतून राहुल गांधी विजयी झाले होते. त्यातील वायनाड मतदारसंघ त्यांनी सोडला.
आमदार, खासदार झाल्याने पोटनिवडणुका
१० राज्यांतील ३१ विधानसभा जागांपैकी २८ जागांवरील आमदार लोकसभा निवडणुकीत लढून विजयी ठरले होते. त्याशिवाय दोन मतदारसंघांतील आमदारांचे निधन झाले. एका आमदाराने पक्षांतर केले. त्यामुळे तिथे पोटनिवडणुका होत आहेत.
त्यातील चार जागा अनुसूचित जाती, ६ जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. या ३१पैकी काँग्रेसकडे ९ जागा, एनडीएने ११ जागा जिंकल्या होत्या. त्यातील ७ आमदार भाजपचे तर दोन जण इतर पक्षांचे होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 13-11-2024













