रत्नागिरी : देवरूख (ता. संगमेश्वर) येथील रोहिदास आळी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ७ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवला. देवरूख पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. ११) दुपारी ते सायंकाळी पाचच्या सुमारास देवरूख-रोहिदास आळी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष बापू कदम (वय ४६, रा. देवरूख-रोहीदासवाडी, ता. संगमेश्वर) यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाची कडी चोरट्यांनी कोणत्यातरी धारदार हत्याराने उचकटून घरात प्रवेश करून घरातील ६ लाख ५६ हजाराचे ९३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १० हजाराची चांदीची मोड व ७० हजार रोख रक्कमेचा समावेश आहे तसेच शेजारी राहणारे सीताराम तुकाराम कदम हे घरात झोपलेले असताना घरातून चोरट्यांनी ७ लाख ३६ हजारांवर डल्ला मारला. या प्रकरणी संतोष कदम यांनी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास देवरूख पोलिस अंमलदार करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 13/Nov/2024














