रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत कामगार सेनेच्या जिल्हा अध्यक्षपदी कृष्णा होडे यांची निवड

साडवली : रत्नागिरी जिल्हा ग्रा. पं. कर्मचाऱ्यांची सभा रविवार, दि. २० ऑक्टोबर रोजी देवरुख येथे झाली. यावेळी नव्याने कमिटी स्थापन करण्यात येऊन जिल्हाध्यक्षपदी कृष्णा होडे यांची निवड करण्यात आली.

या सभेला महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचे राज्याध्यक्ष विलास कुमरवार आणि जिल्ह्याभरातील पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रा. पं. कामगारांचे प्रलंबित प्रश्न, काही समस्या जोमाने सोडविण्यासाठी आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कामगार सेनेची नव्याने स्थापना करत आहोत, असे कुमरवार यांनी सांगितले.

त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नव्याने ग्रा. पं. कामगार सेनेची कमिटी स्थापन केली. त्यात कोकण विभागीय अध्यक्षपदी किरण पांचाळ, जिल्हाध्यक्ष पदी कृष्णा होडे, सचिव म्हणून शंकर कांबळे यांची नियुक्ती केली. त्याच प्रमाणे उपाध्यक्षपदी दयानंद नाक्ते, महिला उपाध्यक्षपदी श्रद्धा गुंड, कार्याध्यक्षपदी राकेश शिवगण, प्रसिद्धी प्रमुख दिपेश नारकर, मार्गदर्शक संजय केळसकर, सदस्यपदी अनिल तांबे यांची निवड करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 13/Nov/2024