रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभेसाठी भाजपा-शिवसेना-रिपाइं महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार उद्योग मंत्री उदय सामंत यांचा नाचणे गावातील महायुतीचे सर्व कार्यकर्ते जोरदार प्रचार करत आहेत.
श्री. सामंत यांनी जाहीर प्रचारसभांपेक्षा गृहभेटीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. भाजप आणि शिवसेनेच्या सर्व शाखांमधील कार्यकर्ते मतदारसंघातील प्रत्येक घरी पोहोचत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज नाचणे गावात प्रचार करण्यात आला.
नाचणे ग्रामपंचायतीचे सरपंच भैय्या भोंगले, उपसरपंच सौ. नाईक, महिला विभाग प्रमुख सौ. बोरकर, ग्रामपंचायत सदस्य शुभम सावंत, सौ. घडशी, सुपल, शाखाप्रमुख सावंत तसेच भाजपा युवा तालुकाध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य संकेत कदम, सदस्या सौ. दीप्ती फडके, तालुका उपाध्यक्ष सुनील आडिवरेकर, समीर सावंत, सुनील नाचणकर, प्रवीण सावंत, शशिकांत कुरूप, सौरभ सावंत, विजय सुर्वे, चिटणीस राकेश कदम, तालुका सरचिटणीस ओंकार फडके हे महायुतीचा ऊमेदवार बहुमताने निवडून येण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 13-11-2024












