खेड : क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी, पुणे येथे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा झाली. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडिअम स्कूल खेडच्या विधी दीपक गोरे (इ. १०वी) हिने सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघात आपले स्थान निश्चित केले.
रोटरी स्कूलच्या विधी गोरे (इ.१०वी) व ईश्वरी गोरे (इ. ७ वी) या बहिणींनी सांगली येथे झालेल्या स्पर्धेत १७ वर्षे खालील मुलींच्या गटात सुवर्णपदक पटकावून कोल्हापूर विभागातून राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेकरिता आपले स्थान पक्के केले. पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील ७ विभागातील खेळाडू सहभागी झाले होते. या राज्यस्तरीय स्पर्धेत ७ विभागातील खेळाडूंवर मात करत विधी हिने ६३ किलो वजनी गटात सुवर्ण व ईश्वरी हिने रौप्यपदक पटकावले. या यशामुळे सर्वच स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 13/Nov/2024












