कुत्र्यांनीच बिबट्याला लावले पळवून.. व्हिडीओ व्हायरल

देवरूख : जंगलात भक्ष्य मिळत नसल्याने मिळेल ते अन्न मिळवून भूक भागवण्यासाठी बिबट्या आता मानवी वस्तीत घुसत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रे ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र देवरूखात कुत्र्यानेच बिबट्याला पळवून लावल्याचे दिसून आले.

देवरूख मधील भर वस्तीत बिबटयाने रविवारी मध्यरात्री एन्ट्री केली. यावेळी बिबट्या कुत्र्यांवर झडप घालण्याचा प्रयत्न करत होता. मात्र कुत्र्यांनीच बिबट्याला पळवून लावत स्वतःची सुटका करून घेतली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

देवरूख कॉलेज मार्गावर मंदार मारुती भाटकर यांचे भर वस्तीत घर आहे. नेहमीप्रमाणे भाटकर यांनी कुत्र्यांना घराबाहेर बांधून ठेवले होते. त्यांना भक्ष्य करण्यासाठी बिबटया मध्यरात्री 1.30 वाजता घराच्या परिसरात आला. त्याने कुत्र्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांनी भुंकत प्रतिकार केल्याने बिबटया त्यांच्या जवळ येऊ शकला नाही.
बिबटया आता शहरात शिरू लागल्याने वनविभागाने यावर उपायोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 13-11-2024