दापोलीत आ. योगेश कदम यांची खर्चात आघाडी

रत्नागिरी : दापोली विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या दिवसापासून ७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांनी निवडणुकीसाठी केलेल्या खर्चाची तपासणी खर्च निरीक्षक पुरुषोत्तम वुमार यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांनी खर्चात आघाडी घेतली आहे.

मनसेचे उमेदवार संतोष सोनू अबगुल यांनी १० हजार ६६०, शिवसेना उद्धवव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय वसंत कदम यांनी १ लाख ८० हजार ७४७, शिवसेनेचे योगेश रामदास कदम यांनी ६ लाख ४९ हजार ७९६, अपक्ष उमेदवार ज्ञानदेव खांबे यांनी २३ हजार १८२, संजय संभाजी कदम व संजय सीताराम कदम यांनी प्रत्येकी १० हजार ९९५, प्रवीण मर्चंडे यांनी ३६ हजार ७६०, कदम योगेश रामदास व कदम योगेश विठ्ठल यांनी प्रत्येकी ११ हजार ५०० इतका खर्च वेला आहे.

या खर्च तपासणी बैठकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षक पुरुषोत्तम वुमार, उत्तम सुर्वे, सुनील जोशी, समीर भाटवडेकर, सहाय्यक खर्च निरीक्षक पवन राठी यांच्यासह ९ उमेदवारांचे खर्च प्रतिनिधी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 13-11-2024