विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका : योगेश कदम

खेड : अल्पसंख्याक बांधव आणि कदम कुटुंबीयांचे खूप जुने नाते असून, हे ऋणानुबंध वर्षानुवर्षांचे आहेत. सोशल मीडियावर विरोधी पक्षाच्यावतीने अपप्रचार सुरू असून, या अपप्रचाराला आपण बळी पडू नका. महायुती शासनाच्या माध्यमातून विकासाच्या दृष्टिकोनातून हे सरकार काम करत आहे आणि यापुढेही काम करत राहील. जातीपातीचे कोणतही राजकारण महायुतीकडून होणार नाही, असे प्रतिपादन दापोलीमधील महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांनी केले.

खेड येथे झालेल्या अल्पसंख्याकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, सिकंदर जस्नाईक मुस्ताक दळवी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. योगेश कदम म्हणाले, युती शासनाच्या काळात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील प्रार्थनास्थळांचा एफएसआय वाढवून दिला. मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाला ५०० कोटींचा निधी या महायुती या शासनाने दिला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी मदरसे उभे करण्यासाठी १० या लाखांचा निधी देण्याची तरतूद महायुती शासनाने केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 13/Nov/2024