रत्नागिरी :शिवशक्ती ग्रुप खेडशी नाका रत्नागिरी येथील युवकांनी दिवाळीमध्ये दुर्गदुर्गेश्वर रायगडची प्रतिकृती साकारून शिवरायांच्या विचारांच्या पाऊलखुणा जागवल्या आहेत. किल्ले, गड दिवाळीत बनवून एकप्रकारे शिवरायांचा इतिहास नव्या पिढीला ज्ञात व्हावा यासाठी शिवशक्ती ग्रुप खेडशी नाका हे कौतुकास्पद कार्य करीत आहे.
सलग आठ वर्षे हा ग्रुप विविध किल्ल्यांची प्रतिकृती साकारत आला आहे.
यावेळी दुर्गदुर्गेश्वर रायगडची प्रतिकृती साकारण्यासाठी त्यांना २ आठवड्यांचा कालावधी लागला. ६ नोव्हेंबरला ही दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ल्याची प्रतिकृती सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली. खेडशी हायस्कूल समोरील मोरेश्वर हॉटेलच्या मागील बाजूस ही किल्ल्याची प्रतिकृती सर्वांना त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत सायंकाळी ६ ते रात्री ११ या दरम्यान पाहता येणार आहे. शिवरायांचा इतिहास नव्या पिढीला ज्ञात व्हावा तसेच मोबाईलच्या आहारी गेलेल्या तरूण पिढीचे लक्ष अशा गोष्टींकडे वेधण्यासाठीच दरवर्षी किल्ल्यांची प्रतिकृती साकारत असल्याचे शिवशक्ती ग्रुप खेडशीनाकाच्या सर्व सदस्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:56 13-11-2024












