GAIL Recruitment 2024: GAIL India मध्ये नोकरीची मोठी संधी

 नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. GAIL India Limited मध्ये वरिष्ठ अभियंता आणि इतर पदांसाठी भरती प्रकिया सुरु केली आहे.

यामध्ये, पात्र आणि इच्छुक उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाइट gailonline.com वर जाऊन अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 डिसेंबर 2024 आहे. GAIL India Limited द्वारे एकूण 261 पदांची भरती प्रकिया सुरु झाली आहे.

विविध पदांसाठी रिक्त जागा

या भरतीद्वारे एकूण 261 विविध पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये वरिष्ठ अभियंत्याच्या 98 पदांचा समावेश आहे. याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या 130 पदे आणि अधिकाऱ्यांच्या 33 पदांचाही समावेश आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार 60 हजार ते 1 लाख 80 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. या भरतीद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांसाठी वेगवेगळ्या पदांसाठी विविध पात्रता आवश्यक आहेत. बहुतांश पदांसाठी अभियांत्रिकी पदवी अनिवार्य आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या पदांसाठी वयोमर्यादाही वेगळी ठेवण्यात आली आहे. पदांनुसार, वयोमर्यादा 28 ते 45 वर्षे असावी.

निवड प्रक्रिया कशी होणार?

सर्व पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवारच पुढील निवड प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. उमेदवारांच्या संख्येनुसार, उमेदवारांना एकाच टप्प्यातून किंवा अनेक टप्प्यातील निवड प्रक्रियेतून जावे लागेल. निवड प्रक्रियेमध्ये गट चर्चा आणि/किंवा मुलाखत यांचा समावेश असेल. वरिष्ठ अधिकारी (F&S), अधिकारी (सुरक्षा) आणि अधिकारी (राजभाषा) वगळता सर्व पदांसाठी निवड प्रक्रिया सारखीच असेल. त्याच वेळी, वरिष्ठ अधिकारी (अग्नी आणि सुरक्षा) आणि सुरक्षा अधिकारी यांच्या निवड प्रक्रियेमध्ये पीईटी आणि मुलाखतीचाही समावेश होतो.

कसा करावा अर्ज?

उमेदवारांनी प्रथम गेल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन GAIL Recruitment 2024 या लिंकवर क्लिक करा. परीक्षा निवडा, PID आणि पासवर्ड टाका. यानंतर अर्ज फी भरा आणि भविष्यातील वापरासाठी कागदपत्रे डाउनलोड करा. दरम्यान, UR/EWS/OBC (NCL) श्रेणीतील उमेदवारांना 200 रुपये नॉन-रिफंडेबल अर्ज फी भरावी लागेल. तर SC/ST/PWBD श्रेणीतील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणत्याबी प्रकारची फी भरावी लागणार नाही.