Breaking : vidhansabha 2024 रामदास कदमांनी मागितली डॉ. विनय नातू आणि भाजप ची माफी

vidhansabha 2024 एका समाज माध्यमाला मुलाखत देताना रामदास कदम यांनी विनय नातू यांच्याप्रती केलेल्या वादग्रस्त विधानानंतर गुहागर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवला आहे. विशेष म्हणजे फक्त गुहागरच नाही तर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दापोलीमध्येही शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांचा प्रचार थांबवला आहे. मतदानाला केवळ आठ दिवस बाकी असताना जिल्हाभरात भाजपने प्रचाराचं काम थांबवल्यामुळे महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आता मात्र रामदास कदम यांनी या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. सन्माननीय विनय नातू यांच्याबाबत मी जी स्टेटमेंट दिली होती ती अनावधाने  दिली गेली. श्री विनय नातू  व भाजप कार्यकर्त्यांना वाईट वाटले असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो. विनय नातू हे माझे जवळचे मित्र आहेत, त्यांची मी लवकरच भेट घेणार आहे असे रामदास कदम यांनी दिलगिरी व्यक्त करताना म्हटले आहे.

“रामदास कदम यांनी तात्काळ डॉक्टर विनय नातू आणि भाजपची माफी मागावी. अन्यथा संध्याकाळपर्यंत आम्ही आमचा निर्णय घेऊ”, अशी आक्रमक भूमिका भाजपकडून घेण्यात आली होती. “विनय नातू हे आमच्यासाठी सर्वोच्च आहेत. त्यामुळे आमच्या नेत्यावरती कोणीही काही बोललेलं आम्ही सहन करणार नाहीत. रामदास कदम आणि ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांची मिलीभगत आहे”, असा आरोप देखील भाजप कार्यकर्त्यांनी केला होता.