आदित्य ठाकरे यांची दापोलीत आज सभा

दापोली : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची गुरुवारी, दि. १४ रोजी दापोलीत जाहीर सभा होणार आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सकाळी ११ वाजता जाहीर सभा होणार आहे. सभेची तयारी झाली असून, दापोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ही सभा होणार आहे. या सभेला शिवसेनेसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 14-11-2024