राजापूर : तालुक्यातील चिखलगाव येथील एका बांधकाम कंपनीच्या गोडावूनमधील सुमारे २ लाख १७ हजार रुपये किमतीचे बांधकामाला लागणारे साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एम. सी. बेट्टीगेरी कन्स्ट्रक्शन कंपनीचे सुपरवायझर गणेश चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
एम. सी. बेटोगेरी कन्स्ट्रक्शन कंपनीचे राजापूर-सौंदळ रस्त्यावर चिखलगाव येथे गोडावून आहे. या गोडावूनमध्ये पूल तसेच रस्त्यांच्या कामाकरिता लागणारे साहित्य ठेवले होते. जून २०२४ मध्ये तेरवण येथील पुलाचे काम संपल्यानंतर पूलबांधणीचे सर्व साहित्य या गोडावूनमध्ये ठेवण्यात आले होते. दर चार-पाच दिवसांनी कंपनीचे सुपरवायझर चव्हाण हे गोडावूनमध्ये जाऊन पाहणी करत असत. ३० ऑक्टोबरला त्यांनी गोडावूनमध्ये जाऊन पाहणी केली असता, सर्व साहित्य जागेवर होते. त्यानंतर ६ नोव्हेंबरला दुपारच्यादरम्यान चव्हाण हे पुन्हा गोडावूनमध्ये पाहणी करण्यासाठी गेले असता गोडावूनच्या गेटचे लॉक व साखळी तुटलेली होती. शटरचे कुलूपही तोडलेले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 14/Nov/2024














