रत्नागिरी : भैय्या सामंत यांच्यासारखा जीवाला जीव देणारा दिलदार मित्र प्रत्येकाच्याच आयुष्यात हवा. आज भैय्या सामंत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राजापूर-लांजा-साखरपा येथील जनतेकडे अशा व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देण्याची चांगली संधी चालून आली आहे. त्यामुळे या संधीचा उपयोग करून त्यांच्यासारखा दिलदार नेता निवडून देणे गरजेचे आहे. या संधीचे सोने करून इथल्या जनतेने किरण उर्फ भैय्या सामंत यांना निवडून द्यावे, असे आवाहन लांजा येथील उद्योजक बाबा भिंगार्डे यांनी केले.
साधारण ३० वर्षांपूर्वी मी व भैय्याशेठ सामंत दोघेही ठेकेदारी व्यवसायात असल्यामुळे एकमेकांचे स्पर्धक होतो. त्या काळात या स्पर्धेमुळे मला प्रचंड मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. कालांतराने माझी आर्थिक परिस्थिती बेताची बनली. काय करावे समजतच नव्हते आणि परिस्थितीने मला सर्व बाजूंनी घेरले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत व्यवसायातील प्रतिस्पर्धी असूनही मनात कोणतीही शंका न बाळगता भैय्याशेठ सामंत यांनी मला मैत्रीचा हात दिला. त्या दिवसापासून आमच्यात जी मैत्रीची गाठ बांधली गेली, ती आजतागायत ३० वर्षानंतरही तशीच कायम कायम आहे, असे भिंगार्डे यांनी सांगितले.
जेव्हा किरण सामंत एखाद्यासमोर मैत्रीचा हात पुढे करतात, तेव्हा कळत- नकळत त्याच्या सर्व समस्यांचे ते तारणहार बनतात. एकप्रकारे ते त्याचे पालकत्वच स्वीकारतात. मीसुद्धा याला अपवाद नव्हतो. आमचे १७ जणांचे कुटुंब आहे. आमच्या संपूर्ण भैय्याशेठ नावाच्या कुटुंबाला आधारवडाचा भरभक्कम पाठिंबा मिळाला. माझ्या दोन्ही मुलांच्या अॅडमिशनपासून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची सर्व जबाबदारी भैय्यांनीच मैत्रीच्या अधिकारात स्वतःकडेच घेतली. आज माझा मुलगा डॉक्टर बनला आणि मुलगी सॉफ्टवेअर इंजिनिअर बनली आहे. एक वडील म्हणून माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. भैय्यांचा आशीर्वादरुपी वरदहस्त माझ्या दोन्ही मुलांच्या डोक्यावर असल्यामुळेच त्यांना हे घवघवीत यश मिळविणे शक्य झाल्याचे भिंगार्डे यांनी म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 14-11-2024














