रत्नागिरी : सणासुदीच्या दिवसात आणि मुख्य थकीत वीजबिल वसुलीसाठी ग्राहकांच्या घरांना म्हणजे दिवाळीच्या दिवसात वसूलीसाठी यावर्षी दिवाळीत महावितरणच्या जनमित्रांकडून भेटी दिल्या गेल्या नाहीत. गेल्यावर्षीपर्यंत दिवाळीत जनमित्र थकीत वीजबिल वसुलीसाठी घरोघरी जात होते. महावितरणचे नवीन अधिकारी रूजू आणि निवडणुकीची असल्याने थकीत दिवाळीतील संकट पुढे गेले महावितरण थकीत वीजबिल महिन्याला बैठका होत बैठकांमध्ये वरिष्ठ अधिकारी अधिकाऱ्यांना वसूलीसाठी प्रवृत्त करतात. कनिष्ठ अधिकारी जनमित्रांना वीजबिल वसूलीचे लक्ष्य देतात. दर महिन्याला ही प्रक्रिया सुरू असते. परंतु सणासुदीच्या दिवसात आणि मुख्य म्हणजे दिवाळीच्या दिवसात वसूलीसाठी जोर लावला जातो. परंतु यावर्षी थकीत ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. महावितरणचे अधीक्षक अभियंता म्हणून वैभव पातोडे यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता कार्यभार पायाभूत सेवेच्या अधीक्षक अभियंता पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. शहरातील पाच उपविभागापैकी तीन शाखा अभियंत्यांची बदली झाली आहे. दोनच जुने शाखा अभियंता कार्यरत आहेत. या नवीन अधिकाऱ्यांनी वीजबिल वसूलीसाठी घेण्यात येणाऱ्या बैठकांची साखळी तोडल्यामुळे थकीत वीजबिल वसुलीसाठी कोणतीही कार्यवाही झाली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 14/Nov/2024












