खेड : शहरातील बसस्थानकासमोर दि.११ रोजी सायंकाळी उशिरा शिवसेना, भाजप, रिपाई, राष्ट्रवादी महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
खेड शहरातील सोमावर दि. ११ रोजी सायंकाळी बसस्थानक परिसरात शिवसेना नेते रामदास कदम, आ. योगेश कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, शहर प्रमुख कुंदन सातपुते, महिला आघाडी प्रमुख माधवी बुटाला, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा प्रमुख बाबाजी जाधव, भाजप माजी तालुकाध्यक्ष संजय बुटाला, शहराध्यक्ष निकेतन पाटणे, रिपब्लिकन पक्षाचे सुशांत सकपाळ, सुरेंद्र तांबे आदींसह महायुतीतील चारही पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बाबाजी जाधव यांच्या हस्ते महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सर्व पक्षाच्या नेत्यांनी मनोगत व्यक्त करून आ. योगेश कदम यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. यावेळी आ. योगेश कदम यांनी विरोधकांना अनेक गावांमध्ये ग्रामस्थ बैठकही घेऊ देत नसून विकासकामे केल्याने किमान पत्रास हजाराच्या मताधिक्याने निवडून येऊ, असा विश्वास व्यक्त केला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 14/Nov/2024














