पाचल : कोकणातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांची बांबूच्या दराबाबत दलालाकडून फसवणूक होत असून याकडे प्रशासन, राज्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष नसल्याने शेतकरी अक्षरक्षः हतबल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या दलालांविरोधात पोलिस स्थानकात तक्रार दाखल करणार असून शेतकऱ्यांना एकत्रित करून संघटित चळवळ उभी करणार असल्याचा इशारा पाचल गावचे प्रगतशील शेतकरी व माजी जि. प. सदस्य मोहन नारकर यांनी दिला आहे.
सरकारकडून बांबू व्यवसायात येणाऱ्या जाचक अट्टी रद्द करण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड करण्यात आली. मात्र, बांबू विक्री करताना दलालाकडून दराबाबत घोर फसवणूक केली जात आहे. बांबूचा दर ठरविताना त्याच्या उंचीवर ठरविला जात असताना प्रत्यक्षात बांबूची मोजमाप करताना बांबूच्या जाडीवरून दर करून २० टक्केच बांबूचे ६० रुपयांच्या दराने मोजमाप करण्यात येते. सुमारे ८० टक्के बांबू तेवढ्याच उंचीचा २५ रूपये दराने घेऊन शेतकऱ्यांची ५० टक्के रक्कम बुडविली जाते. अठरा फुटाच्या वरील बांबूचा तुकडा फुकटच घेतला जातो. एकूणच दिड लाख रुपये किंमतीचा बांबू ५० ते ६० हजार रुपयांत घेतला जातो. अक्षरशः शेतकऱ्यांचे बांबू उत्पादन कवडी मोल दराने विकले जात आहे. या दलालावर प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचा वचक नसल्याने मनात येईल त्याप्रमाणे ते वागत आहेत. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे दलाल मालामाल झाले असल्याचेही नारकर म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 14/Nov/2024














