खेड : दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमधील वांडरर्स क्रिकेट स्टेडियममध्ये १५ नोव्हेंबर २०२४ रोजी भारत व दक्षिण आफ्रिका टी- २० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावेळी खेड जि. रत्नागिरी येथील मनाली बुटाला (शेठ) या ई-सॉफ्ट कंपनीच्या माध्यमातून क्रिकेटच्या विश्वात प्रथमच एआय तंत्रज्ञानयुक्त रोबोचे सादरीकरण करणार आहेत.
मनाली बुटाला-शेठ या येथील सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेश बुटाला यांच्या कन्या आहेत. जगभरातील क्रिकेट चाहत्यांना या टी -२० सामन्याचा रोमांचक अनुभव मिळावा, यासाठी मैदानातील एका विशिष्ट ठिकाणी विशेष असे तीन रोबो बसवण्यात आले असून, दक्षिण आफ्रिकेच्या रंगात सजलेला रोबोट मैदानात खेळाडूंनी चौकार-षटकार मारल्यावर हात दर्शवित नृत्य करून आनंद साजरा करण्यासह क्रिकेटप्रेमीसोबत फोटोही काढणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश प्रेक्षकांच्या अनुभवाला तंत्रज्ञानाची जोड देवून स्टेडियममधील अनुभव अधिक संस्मरणीय करण्याचा एक प्रयत्न आहे. आर्या, बेला व स्नो हे तीन रोबोट मनोरंजनाची कामगिरी करणार असून, या ऐतिहासिक उपक्रमाची साऊथ आफ्रिकेतील क्रिकेट विश्वात उत्सुकता निर्माण झाली आहे.
टी २० मॅचमध्ये चिअर्स गल्सप्रमाणे नाचून क्रिकेटप्रेमींचे मनोरंजन करतात तेच काम हा रोबो करणार आहे. यावेळी क्रिकेटप्रेमी रोबोसोबत फोटोही का काढू शकणार आहेत. स्टेडियममधील अनुभव अधिक संस्मरणीय करण्याचा प्रयत्न यातून होणार आहे.
दोन महिन्यांचे परिश्रम
याबाबत मनाली बुटाला यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, क्रिकेट विश्वात रोबोचे नृत्य सादरीकरणाची कल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षात येत असल्याचा आनंद अवर्णनीय आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी आमच्या टीमला लागला. यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा (एआय) अवलंब करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 14/Nov/2024














