बाळ माने आमच्या विचारधारे विरोधात : ॲड. बाबा परुळेकर

रत्नागिरी : आमच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या बाळ माने यांनी एक खेळी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यानुसार आम्हाला भाजप चा पाठिंबा आहे, ते आम्हाला आतून सपोर्ट करणार आहेत असे चुकीचे पसरवले जातेय. मात्र आम्ही स्पष्टपणे सांगतो की ही सर्व चुकीची माहिती पसरवली जात असून आम्ही तालुक्यात सर्वत्र फिरून हे गैरसमज दूर करतोय. बाळ माने हे आमच्या पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांना विरोध करणे हे आमचे काम आहे, यासाठी आम्ही मोहीम देखील सुरू केली आहे असे वक्तव्य बीजेपी चे जेष्ठ नेते ॲड. बाबा परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:49 14-11-2024