गृह मतदानाची सुविधा लय भारी…९५ वर्षाच्या आजींनी देखील केले मतदान

रत्नागिरी : मतदानाचा टक्का वाढावा तसेच दिव्यांग आणि ८५ वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्या ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींना आजारपणामुळे घराबाहेर पडता येत नाहिये, अशा नागरिकांसाठी ही सुविधा असून आजपासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

२६६ – रत्नागिरी मतदारसंघातील अनेक जेष्ठ नागरिकांनी आणि दिव्यांगानी या सुविधेचा लाभ घेतलाय. यामध्ये जयश्री राजाराम नाईक वय वर्षे ९२ रा. कुंवारबाव, गणपत भाटकर वय वर्षे ८८ रा. साईनगर, शांताराम सीताराम देशपांडे वय वर्षे ८८ रा. साईनगर, सुनंदा मंगेश सिनकर वय वर्षे ९५ रा. पत्रकार वसाहत, दिव्यांग मतदार शिवाजी विठोबा साळोखे वय वर्षे ५७ रा. कातळवाडी यांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:08 14-11-2024