मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या काळात विधानसभा अथवा विधानपरिषदेच्या सदस्यांना स्थानिक विकास निधी नव्याने दिला जाणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिली आहे.
राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेच्या सार्वत्रिक तसेच लोकसभेसाठी पोटनिवडणुका होत आहेत. या अनुषंगाने १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून स्थानिक विकास निधीबाबत निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नव्याने विकास निधी दिला जाऊ नये, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी एखाद्या कामाचे कार्यादेश देण्यात आले असतील आणि प्रत्यक्ष काम सुरू झाले नसेल अशा ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम सुरू करण्यात यावे, तथापि निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काम सुरू झाले असेल तर ते पुढे सुरू ठेवता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या सूचनांनुसार काम समाधानकारकरित्या पूर्ण झाले असेल अशा प्रकरणी देयके अदा करण्यास बंधन असणार नाही, असेही आयोगामार्फत कळविण्यात आल्याचे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:04 14-11-2024