रत्नागिरी : पूर्वी रत्नागिरीत येणारे पर्यटक फक्त गणपतीपुळे आणि पावस करुन माघारी फिरायचे. आता मात्र यात खूप बदल झालाय. उदय सामंत यांच्या माध्यमातून रत्नागिरीत शिवसृष्टी, तारांगण, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा, विठ्ठल मूर्ती, मत्स्यालय, सायन्स गॅलरी, थिबा राजवाडा, लोकमान्य टिळक जन्मस्थानाचे सुशोभीकरण, शहरातील आकर्षक चौक यामुळे रत्नागिरी शहर परिसरात फिरण्यासाठी पर्यटकांना खूप काही आहे. यामुळे पर्यटक येथे जास्त काळ वास्तव्य करू लागला आहे. याचा फायदा येथील हॉटेल व्यवसायिकांना प्रचंड प्रमाणात झाला आहे. सुट्टीच्या वेळी रत्नागिरीतील लॉजिंग हाऊस फुल असतात आणि याचे श्रेय उद्योगमंत्री उदय सामंत यांनाच जाते असे मत रत्नागिरीतील प्रतिथयश हॉटेल व्यवसायिक गणेश धुरी यांनी व्यक्त केलंय.














