कोरोनाच्या संकटात सामंत साहेबच आमच्या पाठीशी उभे राहिले हे आम्ही व्यापारी विसरणार नाही

रत्नागिरी : कोरोना सारख्या वैश्विक संकटात आम्हा रत्नागिरीतील व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे एकमेव नेतृत्व होते ते म्हणजे उदय सामंत. आमचे व्यापार बंद होते, व्यापार सुरू करण्यासाठी अनेक जाचक अटी होत्या, व्यापाऱ्यांवर पोलीस केस होत होत्या. अशा काळात उदय सामंत वगळता कुणीही लोकप्रतिनिधी आमच्या मदतीला आला नाही. एव्हढच काय तर रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या विनंतीनुसार संपूर्ण जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या अडचणी सामंत साहेब सोडवत होते. आमच्या अडचणीच्या काळात केलेली ही मदत आम्ही कधीच विसरणार नाही असे वक्तव्य रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे यांनी केले आहे.