राजापूरातील विठ्ठल रामपंचायतन मंदिरात आज श्रीदेव कार्तिक स्वामी दर्शन योग यात्रा

राजापूर : शहरातील विठ्ठल रामपंचायतन मंदिरामध्ये श्रीदेव कार्तिक स्वामी दर्शनयोग यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील दुर्मीळ कार्तिक मंदिर या ठिकाणी आहे. यंदा शुक्रवार, १५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजून ५४ मि. दर्शन योग सुरू होत असून उत्तरात्री २ वाजून ५७ मि. पर्यंत हा योग आहे. या कालावधीत मंदिर खुले राहणार आहे. कार्तिक पौर्णिमेला यावर्षी कार्तिक स्वामी दर्शन योग आहे. दरवर्षी तो असतोच असे नाही. यंदाच्या दर्शन योगाच्या दृष्टीने संभाजी पेठ मित्रमंडळ, भक्तीवत्सल भक्तिभाव मंडळ यांच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या कालावधीत दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संभाजी पेठ मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 15/Nov/2024