रत्नागिरी : गयाळवाडी येथील घरफोडीतील संशयिताच्या मुसक्या आवळल्या

रत्नागिरी : दोन वर्षांपूर्वी शहरानजीकच्या गयाळवाडी फाटा येथील घर फोडून अज्ञाताने रोख ४ हजार रुपये आणि सोन्या चांदीचे दागिने लांबवणाऱ्या संशयिताच्या पोलिसांनी बुधवारी गोव्यातून मुसक्या आवळल्या. लोकेश रावसाहेब सुतार (३०, रा. लिंगनूर मिरज, सांगली) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत मयुर मनोहर दरेकर (रा. गयाळवाडी फाटा, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, १ एप्रिल २०२२ रोजी अज्ञाताने त्यांचे बंद घर फोडून चोरी केली होती. या प्रकरणी तपास करताना ग्रामीण पोलिसांनी संशयित लोकेशला बुधवार १३ नोव्हेंबर रोजी पणजी-गोव्यातून अटक केली. गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 15/Nov/2024