रत्नागिरी : जयगड येथील जेएसडब्ल्यू हेलिपॅडवर गुरुवारी महायुतीचे स्टार प्रचारक आणि शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक आयोगाच्या कर्मचार्यांनी तपासणी केली.
हेलिकॉप्टरच्या तपासणीदरम्यान मंत्री उदय सामंत यांनी निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे पालन करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचार्यांना सहकार्य करत तपासणी करण्यास सांगितले. यावेळी मंत्री सामंत म्हणाले की, निवडणूक एक लोकशाहीचा सण आहे. हा सण यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे.
निवडणूक आयोगाचे सर्व नियम पाळूनच निवडणूक लढली पाहिजे. निवडणूक आयोगाच्या या तपासणीमुळे निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक होण्यासाठी वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 15-11-2024














